ताजी बातमी

आरे कॉलनीच्या छोटा काश्मीरमध्ये स्वच्छतादूतांना दारूच्या बाटल्या, तसेच काही सीरिंजही आढळल्या. याची नोंद आरेमधील गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तसेच आरे प्रशासनानेही घेतली आहे. छोटा काश्मीरभोवती कुंपण उभारण्याचे आश्वासन आरे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 

छोटा काश्मीरचा परिसर आरे प्रशासनाकडे येतो. इथे महापालिका कचरा उचलण्याचे काम करत नाही. त्यामुळे या पर्यटनस्थळी वर्षानुवर्षांचा कचरा आणि त्याचसोबत दारूच्या बाटल्या, सीरिंजही आढळल्या. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी याची नोंद घेतल्याची माहिती 'मिशन ग्रीन मुंबई'च्या शुभजीत मुखर्जी यांनी दिली. हे उद्यान संध्याकाळी बंद करण्यात येते. तरीही उद्यानात प्रवेशाचे अनेक अवैध मार्ग असल्याने या उद्यानात रात्रीही वावर असण्याची शक्यता आहे. उद्यानाचा परिसर पाच ते सात एकर आहे. आरेकडील अपुऱ्या कर्मचारी संख्येच्या बळावर रात्रीच्या वेळी देखरेखीसाठी कोणी तैनात करणे शक्य नसल्याने घुसखोरीला वाव आहे. त्यामुळे आता कुंपण उभारून अवैध प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आरेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एन. व्ही. राठोड यांनी दिली. मात्र कुंपण तोडूनही लोक आत येतात, उद्यानाच्या रस्त्यालगतच्या बाजूने घुसखोरीची घटना अधिक घडतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला. उद्यानाच्या स्वच्छतेसाठी नागरिक सहभाग नोंदवत असतील, तर आरे प्रशासनाकडून त्यांना पूर्ण मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात