ताजी बातमी

तूडिजिटल संवादातून अंगणवाडीला वेग!

Dharavi Redevelopment Project अंतर्गत आंबेडकर नगर परिसरात सुरू असलेल्या अंगणवाडीसाठी राखीव जागा मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्राधिकरणामार्फत व्हॉट्सअँप ग्रुप ही अभिनव संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या डिजिटल उपक्रमामुळे अंगणवाडी चालकांना त्यांच्या अडचणी व तक्रारी थेट ग्रुपवर मांडण्याची सोय उपलब्ध झाली असून त्यांचे त्वरित निरसन केले जात आहे.

या उपक्रमामुळे संबंधितांना प्राधिकरणाच्या कार्यालयात वारंवार फेरफटका मारण्याची गरज कमी झाली आहे. परिणामी नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. डिजिटल संवादाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न ठरत आहे.

अंगणवाडींसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविल्या जात असल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवादामुळे निर्णयप्रक्रियेला वेग मिळत असून कार्यपद्धती अधिक परिणामकारक बनत आहे.

या अभिनव उपक्रमाची थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित व्हिडिओ अवश्य पाहा.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात