जेट एअरवेज बंद पडण्यामागे षड्यंत्र, असोसिएशनचा आरोप
जेट एअरवेज बंद पडल्याने १६ हजार कायम कर्मचाऱ्यांसह २२ हजार कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासोबत खेळ होत असून यामागे कोण आहे व नवीन गुंतवणूकदार कोण असेल याची माहिती मिळणे गरजेचे आहे, असे मत आॅल इंडिया जेट एअरवेज आॅफिसर्स अॅण्ड स्टाफ असोसिएशनतर्फे व्यक्त करण्यात आले. जेट एअरवेज बंद पडण्यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.