ऐन निवडणुकीत साखर घोटाळ्याची चौकशी सुरू, मायावती अडचणीत
केन्द्रीय अन्वेषण विभागानं (Central Bureau of Investigation) उत्तरप्रदेशतल्या साखर घोटाळ्याची चौकशी सुरू केलीय.
उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी सुरू झाल्यानं मायावतींच्या अडचणीत भर पडलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
२०११
- १२ मध्ये मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यांच्या विक्रीत बाजारदरापेक्षा कमी किंमतीत विकल्यानं सरकारी खजान्याला कथित स्वरुपात जवळपास ११७९ करोड रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय.
ऐन लोकसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.