धक्कादायक! वंचित बहुजन विकास आघाडीच्या दोघांवर हल्ला, घरात घुसून केले वार
पंढरपूर
: निवडणुकांच्या रणधुमाळीत पंढरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि तानाजी हळवणर या दोघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे.
अवैध सावकारकीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.