माहीममध्ये मुलीचे अपहरण
माहीम दर्गा येथून सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पहाटे आणखी एका मुलीचे अपहरण करण्यात आले. माहीम फाटक येथील हॉटेल वेलकमजवळ रस्त्याच्या कडेला कुटुंबियांसह झोपलेली सहा वर्षांची मुलगी बेपत्ता असून याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे माहीम परिसरात घबराट पसरली आहे.
माहीम परिसरात बांबूपासून टोपल्या तयार करणारी अनेक कुटुंबे पदपथावरच वास्तव्य करतात. ७ फेब्रुवारी रोजी येथील पाच वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली. महिन्याभरापूर्वीही एका चार वर्षांच्या मुलीला एक इसम घेऊन जात असताना तिच्या आईने पाहिले. तिने आरडाओरड करताच स्थानिकांनी मुलीची सुटका करून त्या इसमालापोलिसांच्यास्वाधीनकेले.