ताजी बातमी

मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका राष्ट्रीयकृत बँकेतील मॅनेजरला (52) न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाबरोबर एक लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. ही घटना पश्चिम उपनगरात 2013 साली घडली असून आरोपी जामीनावर होता. पण न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला आता अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला (42) संबंधित व्यक्तीकडे दोन वर्षांपासून काम करत होती. पण नंतर त्याची बदली दुसऱ्या शहरात झाल्याने त्याने तिला काम मिळवून देण्याचे आश्वासन देत तिथे बोलावले. पण तिथे गेल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला व तिला पैसे देत परत मुंबईला जाण्यास सांगितले. या घटनेनंतर मुंबईत परतलेल्या पीडीतेने मॅनेजर विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणी बिल्डींगच्या वॉचमनची साक्ष, वैद्यकिय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर मॅनेजरला दोषी ठरवत न्यायालयाने सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात