ताजी बातमी

ज्यांच्या  घरात राहण्याचा आसरा मिळाला त्याच घरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने पकडून आणला. आरोपी दिल्लीत एका बँकेमध्ये काम करीत होता.

मोहम्मद निसार समशेद खान (27) असे त्या आरोपीचे नाव आहे. 2015 ते 2016 या दरम्यान तो घाटकोपर येथील पीडितेच्या घरात राहत होता. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा उचलून मोहम्मदने पीडितवर बलात्कार केला. तसेच घरातील 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व 40 हजार रोख घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात मोहम्मदविरोधात बलात्कार व ‘पॉक्सो’ तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. युनिट-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, उपनिरीक्षक आनंद बागडे, सुनयना सोनावणे तसेच शशिकांत मोरे, धर्मराज ताजणे या पथकाने समांतर तपास सुरू केला. त्यानुसार मोहम्मद यूपीतला असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन शोध घेतला पण तेथे मोहम्मद सापडला नाही. त्याचा कसून शोध घेत असताना मोहम्मद दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेत क्रेडिट  कार्ड विभागात काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बँक गाठून मोहम्मद निसार समशेद खान याला पकडून आणले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात