ताजी बातमी

निवडणूक बंदोबस्तासाठी सातारा जिल्ह्यात जाण्याचे आदेश असताना त्याठिकाणी गैरहजर राहिलेल्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले आहेत, यात आपल्या वडिलांच्या तेराव्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

19 एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयातून लोकसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना सातारा येथे पाठवण्यात आले होते. पोलीस हवालदार गुलाब आडे (ब.न.1789) हिमायतनगर,पोलीस शिपाई कृष्णा चुनोडे (ब.न.3116) मांडवी, पोलीस हवालदार बाबुराव सूर्यवंशी (ब.न.283) देगलूर,पोलीस नाईक सरदार हुजुरीया (ब.न.2382) वजिराबाद,पोलीस हवालदार विजय धुळगंडे (ब.न.2268) कंधार,पोलीस नाईक सादिक पठाण (ब.न.192),पोलीस नाईक मुनहर हुसेन (ब.न.1128) शहर वाहतूक शाखा,पोलीस शिपाई गोपाळ तोटलवार (ब.न.2161) शिवाजीनगर, पोलीस शिपाई देवानंद मोरे (ब.न.3015) लिंबगाव,पोलीस शिपाई राजू कांबळे (ब.न.2466) सिंदखेड,महिला पोलीस नाईक ज्योती मरकंटेवार (ब.न.1166),पोलीस नाईक मिलिंद लोणे (ब.न.2146) विमानतळ यांना पाठवण्यात आले होते.


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात