उच्चभ्रू वस्तीत सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू
ठाण्यात सोसायटीतला सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय. ढोकाळी नाका परिसरातील प्राईड प्रेसिडेन्सी लुक्सिरिया या उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचं समजतंय.
सोसायटीची सिव्हरेज सेफ्टी टँक साफ करण्यासाठी एकूण ११ कामगार सफाईचं काम करत होते. सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर आठ कामगारांना जवळच्याच मेट्रो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सिव्हरेज टँकमधल्या विषारी वायूनं तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जणांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलं.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.