आरपीएफच्या सर्तकतेमुळे प्राण वाचले
कुर्ला स्थानकात धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफार्म आणि लोकल पोकळीत अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले. जमील शेख असे या प्रवाशाचे नाव आहे. सोमवारी दुपारी १२.५२ मिनिटांनी जमील धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्यामुळे पोकळीत अडकला. सुमारे १०० मीटर फरफटत गेल्यानंतर प्रवाशांनी साखळी ओढून लोकल थांबवली. आरपीएफ जवानांनी त्याला प्रवाशांच्या मदतीने सुखरुपपणए बाहेर काढले. दरम्यान या प्रवाशांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे सोमवारी या व्हिडीओची चर्चा रेल्व प्रवाशांमध्ये रंगली होती.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.