ताजी बातमी

अवैध डान्स बारना अभय दिल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आरंभलेल्या सक्त कारवाईचा परिणाम पोलीस, डान्स बार मालक-चालकांवर झालेला नाही. सोमवारी रात्री धारावीतल्या अवैध डान्स बारवरील कारवाईतून ही बाब स्पष्ट झाली.

रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास धारावीतल्या डिस्कव्हरी बारवर छापा घातला. बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली आठ बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करताना आढळल्या. लांडे आणि गस्तीवरील पथकाने १३ ग्राहकांसह बारच्या सहा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. बारमधून ८५ हजार रुपये हस्तगत केली.

शहरात एकाही डान्स बारला अद्याप परवानगी मिळालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार बारमालकांनी पोलीस आयुक्तालयाकडे परवानगीसाठी केलेले अर्ज विचाराधीन आहेत. बारबंदीनंतर शहरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा नवा पायंडा पडला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात