मुंबई ते नाशिक 'मेमू'
लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील हजारो प्रवाशांना लवकरच प्रवासाचा सुखद अनुभव घेता येईल. मुंबई-नाशिक मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, या मार्गावर मेमू चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे. याच बरोबर मध्य रेल्वेतील पॅसेंजर ट्रेनच्या जागेवरही मेमू ट्रेन धावणार आहे.
अलीकडच्या काळात मुंबई-नाशिक-भुसावळ मार्गावरील प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, मुंबई-नाशिक कामासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने अन्य मेल-एक्स्प्रेसवर ताण येतो. यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. मुंबई-नाशिक मार्गावर घाट विभागात मेमूसाठी कोणतीही अडचण नसल्याने लोकलऐवजी मेमू हा पर्याय निश्चित करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.