ताजी बातमी

शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे प्रवासासाठी रेल्वेवर भार वाढला आहे. यातच रेल्वे स्थानकांवरील विविध कामांमुळे स्थानकांवर प्रवाशांची लोकल प्रतीक्षेसाठी तारांबळ उडत आहे. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि वडाळा रोड या पाच वर्दळीच्या स्थानकांवर सुरक्षेच्या कारणास्तव टप्प्याटप्याने प्रवेशद्वारे बंद करण्याचे नियोजन केले आहे. मात्र सध्या गर्दीच्या स्थितीत आणि पावसाळा दृष्टिक्षेपात असताना केवळ प्रवेशद्वारे बंद करणे हे गर्दी वाढण्यास कारणीभूत ठरेल. मात्र स्थानक सुरक्षेसाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा वापर करून अन्य उपाय राबवणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात