ताजी बातमी

राज्यात मागील २५ महिन्यांमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ३२ हजार ९७९ बालमृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये शून्य ते एक वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण एक ते पाच वर्षांमधील मुलांच्या तुलनेमध्ये अधिक असल्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (आयसीडीएस) मासिक अहवालातील नोंदीत समोर आले आहे. दुष्काळामुळे पाण्याचे, पोषक अन्नाचे प्रश्न राज्याच्या अनेक ठिकाणी आ वासून उभे राहिले आहेत. त्यामध्येच बालमृत्यूचा प्रश्न सोडवण्यातही सरकारला अपयश आल्याचे बोलले जात आहे.

'आयसीडीएस'अंतर्गत मासिक अहवालाच्या नोंदीमध्ये जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये मध्यम आणि तीव्र गटातील मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढताना दिसते. जानेवारी २०१७ मध्ये ७३,९६,८८३, तर २०१८ मध्ये ७६,१०,२०१ आणि जानेवारी २०१९मध्ये ५८,९,१७८ इतकी मुले यांमध्ये आढळून आली. या गटांतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यांच्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ती मृत्यूच्या दाढेत लोटली जाऊ शकतात.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात