राष्ट्रीय चॅलेंज कप कराटे चॅम्पियन शिप 2019
यूनिटेड शोटोकान कराटे डो असोसिएशन, गोवा , याच्या विद्यमाने अरपूरा, गोवा, येथे दि.17 ते 22 मे, 2019 रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत यूनिटेड शोतोकान कराटे असोसिएशन च्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून आपली छाप या नॅशनल स्पर्धेत पडली. अवर लेडी हायस्कूल सायन चा दहावी मध्ये शिकणारा कु. वेदांत कायंदेकर याना काता आणि कुमिते मध्ये सुवर्ण व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
तसेच एल्फिन्स्टन कॉलेज फोर्ट मध्ये बी. एस. सी. पहिल्या वर्षा शिकणारी कुमारी समिक्षा दिपक कायंदेकर याना काता आणि कुमिते मध्ये सुवर्ण व रजत पदक पटकावले.
या दोन खेळाडूंना यूनिटेड शोतोकान कराटे असोसिएशन चे अध्यक्ष आणि प्रशिक्षक श्री मंदार पनवेलकर सर, तसेच प्रशिक्षक विनीत साठे सर, निलेश भोसले सर, व प्रशांत गांगर्डे सर यांचे सहकार्य लाभले.
या सर्वांच्या हस्ते या दोन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत विविध राज्यातील खेळाडू आणि संघ यांनी भाग घेतला .