ताजी बातमी

संपत्तीच्या वादातून एका इसमानं स्वत:च्या नातेवाईकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना साकीनाकापरिसरातील नहार सोसायटीत आज घडली. इब्लिस खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर आरोपी स्वत: साकीनाका पोलिसांना शरण गेला.


पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती. परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडल्याची  प्राथमिक माहिती आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात