ताजी बातमी

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सोमवारी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. डॉ. पायल हिला त्रास दिल्याबद्दल तसेच, जातीवाचक अपशब्दांनी तिची हेटाळणी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. 

स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्यासह वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे, डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी नायर महाविद्यालयातील सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. समितीने सर्व बाजूंनी चौकशी करून दिलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात