ताजी बातमी

मुंबई : राज्यात खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातांत जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ मध्ये १६६ जणांचा मृत्यू झाला. बुलढाण्यात म्हणजे ३० जणांचा मृत्यू झाले असून त्यापाठोपाठ लातूर, सोलापूर, नंदुरबार, नवी मुंबईमध्ये बळी गेले असल्याचे महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता याप्रकरणी संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर किंवा टोलवसुली करणाऱ्या कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या बैठकीत संबंधित विभागांना दिल्या आहेत.

२०१८ मध्ये खड्डय़ांमुळे झालेल्या एकूण ५५२ प्राणांतिक अपघातात ५४८ जण जखमी झाले आहेत. उपराजधानी नागपूरमध्येही अपघाताचे प्रमाण मोठे आहे. १११ अपघातांत ६ जणांचा मृत्यू झाला असून १२८ जण जखमी झाले आहेत. रस्त्यांच्या सुमार दर्जाच्या कामांमुळे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडतात. यातून वाट काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात खड्डय़ांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याने अपघातांचे प्रमाणही याच तीन महिन्यात अधिक असते. वाहन चालवताना खड्डे न दिसणे, अचानक खड्डय़ात वाहन गेल्यास ब्रेक लावणे यामुळे मागून किंवा समोरून येणाऱ्या अन्य वाहनाची धडक लागून चालक किंवा त्याच्या सहकाऱ्यांना अपघातांना सामारे जावे लागण्याच्या घटना घडत असतात

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात