ताजी बातमी

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात घडली आहे. स्वराज गुरनुले असे या चिमकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वराज अवघ्या ९ महिन्यांचा आहे. स्वराज घरात झोपलेला असताना बिबट्याने त्याला घरातून पळवून नेले. शोधाशोध केल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. चिमुकल्या स्वराजला घरात घुसून बिबट्याने पळवून नेत ठार केल्याच्या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

भारतनगरमधील बसेरा गृहनिर्माण सोसायटी ही एसआरए योजनेंतर्गत बांधण्यात आली आहे. ही योजना राबविताना अनेक गैरप्रकार घडले असून अनेक नियमांचा भंग करण्यात आला आहे. अनेकांना झोपड्या असूनही घरे मिळाली नाहीत. हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी फिरोज मोहम्मद रफिक सय्यद हा दर शुक्रवारी फोटो आणि व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करतो. यामध्ये स्थानिक नगरसेविका गुलनाज कुरेशी आणि बिल्डर यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही रफिक आपल्या पोस्टमधून करीत असे. यामुळे संतापलेला नगरसेविकेचा पती सलीम कुरेशी याने त्याच्या समर्थकांसह शुक्रवारी रात्री रफिक याला गाठले. याबाबत जाब विचारत सलीम आणि त्याच्या समर्थकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून बाबुभाई मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावला. जमावाने रफिकसह बाबूभाईला लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण केली. त्या मारहाणीत बाबूभाई जखमी झाला. याबाबतची माहिती मिळताच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या बाबूभाईला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे १५ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून शनिवारी सात जणांना अटक केली. इतर हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान अटक केलेल्या सात जणांना न्यायालयाने सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात