पायलटच्या प्रसंगावधानामुळे मुंबईकडे येणाऱ्या 158 जणांचे वाचले प्राण
पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या एका विमानाचे औरंगाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. गो एअरच्या या विमानातून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानात झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करावा लागले. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात आले.
गो एअरच्या जी-8586 मुंबईसाठी पाटण्यातून उड्डाण केले होते. पण त्यानंतर त्याचे औरंगाबादमध्ये लँडिंग करण्यात आले. विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला हे अद्याप समजले नाही. विमानात क्रू मेंबरसह 158 जण होते. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आल्याचे गो एअरच्या प्रवक्त्याने सांगितले.