ताजी बातमी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. मुस्लिम कर्मचारी बांधवांना ईद उल फितर (रमजान ईद) उत्साहात साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन लवकरच अर्थात 4 जून रोजी करावे, असे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 7 तारखेला होते. पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने उद्याच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या 71 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय घेऊन रावते यांनी एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ईदची अनोखी भेट दिली आहे.दिवाकर रावते यांनी सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात