ताजी बातमी

 म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून मुंबईतील उपकरप्राप्त तेवीस इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना म्हाडामार्फत पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत, मात्र तरीही या इमारतींमधील सुमारे ३२९ कुटुंबांनी घरे खाली केलेली नाहीत. या अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले. या धोकादायक इमारतींची माहिती देण्यासंदर्भात मंगळवारी म्हाडाच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले
होते.

२०१९ सर्वेक्षणातील अतिधोकादायक इमारती
१४४, एम जी रोड, एक्स्प्लेन्ड मेन्शन
२०८-२२० काझी सय्यद स्ट्रिट
२२-२४, उमरखाडी २ री क्रॉसलेन ,मुंबई सिराज लेन
१४५- १५१, आरसी वालाबिल्डींग
१५२ -१५४,चिमना बुचर स्ट्रीट
१०१ -१११ बारा इमाम रोड,
७४, निझाज स्ट्रीट,
१२३, किका स्ट्रीट
३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी.रोड,
२१८-२२०, डी १२३१ (१) & डी-१२३१(३) राजाराम मोहन राय मार्ग
५ जे सुनंदा बिल्डींग, डी-१६१५(२) दुभाष लेन, गिरगाव,
४१९ नूर मोहम्मद बेग, मोहम्मद कंपाऊंड, डी-४६९ व्ही.पी.रोड,
४४३ वांदेकर मेंंशन, डी-४३१ डॉ.-४३१ डॉ.दादासाहेब भडकमकरमार्ग, गिरगाव
२२६-२२८, राजाराम मोहन मार्ग, गिरगाव,
२४१-२५१, डी-११९४ राहाराम मोहन रॉय मार्ग, गिरगाव
५८-खत्तर गल्ली, मधुसुदन बिल्डींग खत्तर गल्ली, गिरगाव
६९-८१, खेतवाडी ३ री गल्ली, गणेश भुवन इमारत ३९, चौपाटी, सी फेस
सी एस नं. ८२९,१/८२९ आणि ८३० दादाभाई चाल क्रमांक ५, लोअर परेल
३७ डी, बॉम्बे हाऊस,डॉकयार्ड रोड
२३ सक्सेस रोड, माझगाव
१-१ ए, ३-३ ए, हाथीबाग, डी.एन.सिंग रोड

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात