ताजी बातमी

उरणमधील खोपटा पुलाच्या खांबावर दहशतवादी हल्ल्याबाबत इशारा देणारे संशयास्पद लिखाण केल्याप्रकरणी उरण पोलिसांनी एकाला संशयित म्हणून अटक केले आहे. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमीरउल्ला अजिमउल्ला शेख (वय ३३) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो खोपटा गावातीलच बांधपाडा येथे भाडय़ाने राहत होता. या परिसरात त्याचे मागील दहा वर्षांपासून वास्तव्य आहे. दोन वषार्र्पासून त्याच्यावर मानसिक आजार असून उपचार सुरू असल्याचा दावा त्याने केला असला तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

उरणमधील पूर्व व पश्चिम या दोन भागांना खोपटा खाडीमुळे विभागालेले आहे. या खाडीवर असलेल्या खोपटा येथील नव्या खाडी पुलाच्या एका खांबावर दोन भागांत या भागातील मुख्य प्रकल्पांची माहिती तसेच या प्रकल्पांचा दिशेने येणारे रॉकेटचे प्रकार, येण्यासाठीचे मार्ग यांच्यासह सांकेतिक शब्दात व आकडय़ात संशयास्पद लिखाण करण्यात आले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एक तरुण या परिसरात आला होता. त्याच्याकडे काही साहित्य असल्याची माहिती मिळाल्यानुसार या तरुणाचा पोलिसांना शोध घेत त्याला अटक केली. गुरुवारी त्याला उरण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली. तसेच उरण पोलीस अधिक तपास करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात