ताजी बातमी

दुबईत बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जून रोजी गुरुवारी हा अपघात झाला. बसमधून एकूण ३१ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राशीदिया एक्झिटजवळ असताना बसने सिग्नल तोडला असता हा अपघात झाला.

या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेगवेगळ्या देशातील नागरिकांचा समावेश आहे. पाच जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. जखमींना तात्काळ दुबईमधील राशीद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे चार भारतीयांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आलं. काही जखमींवर अद्याप उपचार सुरु आहे.

स्थानिक प्रशासनाने भारतीय दुतावासाला आठ भारतीयांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहेत. राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात