ताजी बातमी

हितेश हेमंत मल्होत्रा (३३) असे या युवकाचे नाव असून वर्तकनगर येथील दोस्तीविहारमध्ये राहतो. त्याच्या आई-वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय असून हितेश हा नवी मुंबईतील एका कंपनीत काम करतो. शनिवारी सायंकाळी कॅडबरी जंक्शन येथून अंमली पदार्थ विरोधी पथकाने हितेशला ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांना बघून पळून जात असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. यावेळी त्याच्याकडून १४० मिली ग्रॅम वजनाचे १० एलएसडी पेपर, मोबाइल, ३०० रुपयांची रोकड आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईनंतर पोलिसांनी हितेशच्या घराची झडती घेतली. तीन बीएचकेचा फ्लॅट असलेल्या घरामध्ये हितेशची स्वतंत्र बेडरूम असून या बेडरूममधून पोलिसांनी ९७० ग्रॅम चरस आणि १३ एलएसडी पेपर हस्तगत केले. या अंमली पदार्थांची किंमत २ लाख ६० हजार असून एकूण साठा ३ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा आहे. विशेष म्हणून त्याच्या घरात पोलिसांना वजन काटा आणि प्लास्टिकच्या पाऊचही सापडल्या आहेत. मागील तीन ते चार वर्षपासून अंमली पदार्थांच्या तस्करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पोवार यांनी सांगितले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात