ताजी बातमी

अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीने दिंडोशी येथील कोर्टाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पवई येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर विकास पवार या नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केला. पोस्को अंतर्गत त्याला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. शनिवारी त्याला सुनावणीसाठी दिंडोशी येथील सेशन कोर्टात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने सोबत असलेल्या पोलीस गार्डच्या हाताला झटका देऊन सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. विकास पवार हा घाटकोपरचा रहिवासी होता.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात