महिला ड्रग्ज तस्कर अटकेत
अंमली पदार्थ विरोधी पथकाने माहीममधून निलोफर हाफिज शेख (४४)
या महिलेला अटक केली. निलोफर हिच्याकडून पोलिसांनी २० लाख रु.चे हेरॉईन आणि एमडी ड्रग्ज हस्तगत केले.
माहीम परिसरात निलोफर ही
ड्रग्जविक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटचे पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक मराठे, चव्हाण यांच्या पथकाने निलोफर हिला माहीम परिसरातून ताब्यात घेतले. झडतीमध्ये तिच्याकडे ३०० ग्रॅम एमडी आणि ६० ग्रॅम हेरॉईन सापडले. दुसऱ्या एका कारवाईत घाटकोपर युनिटचे पोलिस निरीक्षक शशांक शेळके, उपनिरीक्षक बोबडे यांच्या पथकाने एल. बी. एस. मार्गावरील विक्रोळीजवळ जावेद वाहिद अली सय्यद याला अटक केली. त्याच्याकडून सव्वा दोन लाख रु.चे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.