ताजी बातमी

अहमदनगर: व्याजाच्या पैशातून तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहरातील नगर-मनमाड मार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. योगेश इथापे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोराने त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसरीकडे, आरोपी कृष्णा गायकवाड याने स्वत:हून तोपखना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कृष्ण गायकवाड यांच्याकडून योगेश इथापे याने व्याजाने पैसे घेतले होते. अनेकदा मागूनही त्याने ते परत दिले नाही. या रागातून कृष्णा गायकवाडने त्याच्यावर कोयत्याने वर केले. आरोपीविरूद्ध तोपखना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात