ताजी बातमी

मुंबईत गेल्या काही वर्षात वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेली धडक कारवाई आणि जनजागृती यामुळे मद्यपी चालकांमध्ये कमालीची घट झाली आहे. २०१४ पासूनचा चढता आलेख २०१७पासून खाली येताना दिसत आहे. सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंत ७४ हजार ३५ मद्यपी चालक पोलिसांच्या कारवाईत सापडले असून त्यांच्याकडून २० कोटी सात लाख ७२ हजार ५० दंड वसूल करण्यात आला आहे. 

दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे अपघातांमध्ये झालेली वाढ पाहता वाहतूक पोलिसांनी सन २०१४ पासून 'ड्रंक अँड ड्राइव्ह' मोहीम हाती घेतली. याचा परिणाम म्हणजे सुरुवातीला दारू पिऊन वाहन चालविणारे पकडले जाण्याची संख्या अधिक होती. २०१६ पर्यंत वर्षगणिक हा आकडा वाढतच होता. मुंबईत लावण्यात आलेले सीसीटीव्ही, ठिकठिकाणी लावण्यात येणारी नाकाबंदी आणि दारुड्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कडक कारवाई यामुळे दारू पिऊन वाहने चालविण्याचे प्रमाण कमी झाले. थर्टी फर्स्ट आणि काही सणांचे सेलिब्रेशन सोडले तर मद्यपी चालकांची संख्या फारच घटली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात