ताजी बातमी

मालाड सब-वेमध्ये साचलेल्या पाण्यात अडकलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये गुदमरून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. इरफान खान आणि गुलशाद शेख अशी त्यांची नावे आहेत. मालाड पश्चिमेकडून पूर्वेला जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची कार मध्येच बंद पडली. पाऊस मुसळधार कोसळत होत आणि त्यातच कारचे दरवाजे उघडत नसल्याने या दोघांना बाहेर पडता येत नव्हते. बरेच प्रयत्न केल्यानंतर इरफानने आपण पाण्यात अडकलो असल्याची माहिती मालकाला फोन करून दिली. मदतीला कुणी येईपर्यंत पाणी दहा फुटांच्या वर गेले. हे पाणी कारमध्ये शिरून दोघेही गुदमरले. रात्रीच्या अंधारात कार कुणालाही दिसली नाही. पहाटे ४ वाजता हा प्रकार उघड झाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. कारच्या काचा फोडून इरफान आणि गुलशाद यांना बाहेर काढून तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. दोघेही पठाणवाडी येथे राहणारे होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात