ताजी बातमी

एसटी  यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्याचा फायदा अवैध वाहतूकदारांना होतो. मंगळवारी अवैध वाहतूकदारांना अटका अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्ञानेश्वर बाबुराव पाटील असे जखमी एसटी अधिकाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी परळ आगाराने दिलेल्या अहवालात हा अपघात असल्याचे म्हटले आहे. 
c
स्थानकावर अवैध प्रवासी वाहतूकीला अटकाव करण्यासाठी मंगळवारी नेहमीप्रमाणे पाटील शिवनेरी स्थानकावर पोहोचले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाठीमागून एका वाहनाने त्यांना धडक दिली. तसेच वाहन चालकांने पाटील यांचीच चूक असल्याचे सांगत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मारहाणीत पाटील यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली असून; कानाला टाके पडले आहेत. 

राज्यभरात अवैध वाहतूक जोरात सुरू असताना एसटी महामंडळातर्फे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक ठिकाणी स्थानिक राजकारणी आणि पोलिसांच्या संगनमताने अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. अवैध वाहनांचे फोटो आणि माहिती मुख्यालयात पाठवूनही त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. 

दादर येथून मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या बेकायदा वाहनांवर देखरेख ठेवणे, प्रवाशांना सावध करणे अशा कामासाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक पाटील यांची दादर एसटी स्थानकात नियुक्ती करण्यात आली होती. परळ आगाराच्या व्यवस्थापकाने दिलेल्या अहवालात, कर्तव्यावर असताना पाठीमागून मोटारसायकलने धडक दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर के.ई.एम रुग्णालयात उपचार सुरू असून बुधवारपर्यंत याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नव्हती, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात