ताजी बातमी

तब्बल १४ वर्षांपासून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने बुधवारी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा खंडित केला. बिल न भरणाऱ्या सुमारे तीन हजार ग्राहकांना या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या परिसरात जवळपास ७७ कोटी रुपयांहून अधिक बिल थकित असून, प्रत्येक ग्राहकाकडे तीन ते चार लाख रु.ची थकबाकी असल्याचे समजते.

बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा वीज न भरणाऱ्या ग्राहकांना देण्यात आला होता. त्यापुढील कारवाई म्हणून कंपनीने गेल्या वर्षी या ग्राहकांची वीज खंडित केली होती. परंतु, ती कारवाई तात्पुरत्या स्वरूपात होती. थकबाकीदार ग्राहकांमुळे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना फटका बसू नये म्हणून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. जून, २०१८मध्ये पुरवठा पुन्हा खंडित केल्यानंतर तीन महिन्यांत बिलाचा भरणा करण्यात येईल, असे आश्वासन थकबाकीदार ग्राहकांकडून मिळाले होते. त्यानंतर रहिवाशांनी विनंती केल्यामुळे २२ डिसेंबर, २०१८पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. तरीही बिले भरली गेली नाहीत. बिलाचा भरणा करावा यासाठी कंपनीने मध्यस्थांमार्फत वेळापत्रक आखून दिले होते. त्यासही प्रतिसाद मिळाला नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. थकित बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात