ताजी बातमी

ठाणे: भिवंडीतील दापोडा या भागात असलेल्या प्रेरणा कंपाउंडमधील एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या गोदामात छोटे स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचेही स्थानिकांनी माहिती देताना सांगितले.

आज (मंगळवार) पहाटेचया सुमाराला केमिकलच्या गोदामात आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात