सिद्धीविनायक न्यास'तर्फे शहिदांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणार
आज कारगिल विजयाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त द्रास-कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जात आहे. सिद्धीविनायक मंदीर न्यासतर्फे यानिमित्त एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहिद जवानांच्या मुलांचा केजी टु पीजी असा खर्च सिद्धीविनायक न्यासतर्फे उचलण्यात येणार आहे.
सीमेवर लढणारे जवान आपल्या सर्वांचे रक्षण करत असतात म्हणून आपली जवानांच्या कुटुंबाप्रती ही जबाबदारी असल्याचे सिद्धविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी झी 24 तास' ला सांगितले. शहिद जवानांच्या मुलांच्या केजी टु पीजी चा खर्च सिद्धिविनायक न्यासने करण्यात येईल असे ते म्हणाले.