मुंबईत ATS ने केला अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड, 7 अटकेत
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई केली आहे. अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा भंडाफोड करून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी 7 जणांनी अटक केली आहे. आरोपींकडून 500 बनावट सिम, अनेक टेलीफोन रिसूव्हर, 3 लॅपटॉप, 4 डेस्कटॉप, 11 मोबाइल फोन, एक सर्व्हर आणि 4 वायफाय राऊटर जप्त केले आहे.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी एकूण 5 ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजमधून बहुतांश कॉल मिडल ईस्ट देशांमध्ये करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या अवैध आंतरराष्ट्रीय टेलीफोन एक्स्चेंजचा वापर देशात घातपातासाठी वापर होत असल्याचा संशय एटीएसने वर्तवला आहे. व्हीवोआयपी इंटरनेट कॉलद्वारे लोकल नंबरला यूएई आणि आखाती देशांमध्ये रूट करण्याचे काम चालत होते. व्हीओआयपी कॉलद्वारा सरकारला सुमारे 37 कोटी रुपयांना चूना लावल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे.