ताजी बातमी

मुंबई : देशात मासेमारीत दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या वर्सोवा बंदराला नवीन साज येणार आहे. येथील २४ एकर जागेवर ३३६ कोटी रुपये खर्च करून वर्सोवा बंदराचा कायापालट करण्यात येणार आहे. वर्सोवा बंदराच्या विकासाचा प्रस्ताव राज्याने केंद्र सरकारला पाठविला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना शीतगृह, मच्छीमार बोटींसाठी लागणाºया सुविधा मिळणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर येथील मच्छीमारांना अच्छे दिन येणार आहेत.

मत्सोद्योग विकास महामंडळाने वर्सोव्यासह राज्यातील ८ बंदरांचा विकास आराखडा तयार केला आहे. मासेमारी बंदराच्या विकासाचा प्रस्ताव महामंडळाने केंद्र सरकारच्या तांत्रिक परिरक्षणाचे काम करणाºया सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल इंजिनीअरिंग आॅफ फिशरीज (सीआयसीडीएफ) या संस्थेकडे पाठविला होता. संस्थेने वर्सोवा बंदराच्या विकासाला मंजुरी दिली असून, लवकरच राज्य सरकार सदर प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार आहे.

केंद्राच्या मंजुरीनंतर वर्सोवा बंदराच्या नवनिर्माणला प्रत्यक्षात लवकर सुरुवात होईल, अशी माहिती वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात