मुलुंडमध्ये वृद्धेची घरात घुसून हत्या
मुलुंड येथे
एकट्याच राहणाऱ्या वृद्ध महिलेची घरात
घुसून हत्या केल्याची
घटना उघडकीस आली
आहे. रुक्षामणीबेन
विसारीया (६८)
असे हत्या करण्यात
आलेल्या महिलेचे नाव
असून याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल
केला आहे.
मुलुंडच्या
आरआरटी मार्गावरील त्रिवेणी भुवन इमारतीत
रुक्षामणीबेन राहत होत्या.
तिन्ही मुले स्वतंत्र
राहू लागल्यानंतर वसारीया घरी एकट्याच
राहात होत्या. काही
दिवसांपूर्वी गावी गेलेल्या
रुक्षामणीबेन रविवारी परतणार
होत्या. त्यानुसार
सोमवारी घरकामासाठी मोलकरीण त्रिवेणी भुवनमध्ये
गेली. मात्र
दारावरची बेल वाजवून
घरातून बराच काहीच
वेळ प्रतिसाद मिळत
नसल्याने तिने दुसऱ्या
चावीने दरवाजा उघडला
असता, रुक्षामणीबेन
बेशुद्धावस्थेत आढळल्या.
त्यांना तात्काळ जवळच्या
रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित
केले. रुक्षामणीबेन
यांची गळा दाबून
हत्या करण्यात आल्याचा
प्राथमिक अंदाज आहे.
त्यांच्या अंगावरील तसेच
घरातील दागिने आणि
मौल्यवान वस्तू चोरीला
गेल्या नसल्याने ही
हत्या नेमकी कशासाठी
करण्यात आली, याचा
तपास मुलुंड पोलिस
करीत आहेत.