ताजी बातमी

सकाळी कामावर निघालेल्या महिलेला अनोळखी व्यक्तीची लिफ्ट घेणे खूपच महागात पडले असून कारचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील वाशिंदमध्ये घडली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसांत आरोपीला भिवंडीतील पडघा येथून अटक केली आहे.

पीडित ३८ वर्षीय विवाहित महिला वाशिंद परिसरात राहत असून ठाण्यात कामाला आहे. शनिवारी (७ सप्टेंबर) सकाळी नेहमीप्रमाणे ही महिला कामावर जाण्यासाठी घरातून निघाली. वाशिंद रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास तिने एका कारचालकाकडे लिफ्ट मागितली. चालकाने कार तिच्याजवळ थांबवत लिफ्ट दिली. आणि कार निघाली. कारमध्ये ही महिला चालकाच्या शेजारच्या सीटवर बसली होती. चालकाने कार वाशिंद स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि महिलेवर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून महिलेने थेट वाशिंद पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर गाडीचा नंबर मिळाला. संबंधित पत्त्यावर जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपीचा काही ठावठिकाणा लागला नाही. गाडीच्या विम्यावरून आरोपीला पकडण्याच्या हालचाली चालू केल्या. विमा एजंटच्या माध्यमातून काही माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी एक मोबाइल नंबरही अपडेट केला होता. या क्रमांकाद्वारे आरोपीचा शोध घेत असताना हा मोबाइल नंबर पडघा येथील एका व्यक्तीचा होता. पोलिसांनी तत्काळ या व्यक्तीला शोधून काढले असता त्याने ही कार विकल्याचे माहिती पुढे आली. कार खरेदीदाराचे नाव निष्पन्न झा ल्यानंतर पोलिस त्याच्या नयीबस्तीमध्ये घरी गेले. संबंधित कार त्याठिकाणी उभी असल्याचे दिसून आले. कार विकत घेणाऱ्या व्यक्तीचा भाऊच आरोपी होता. मात्र आरोपी अमरावतीला गेला होता. तो येईपर्यंत पोलिस पडघा भागातच ठाण मांडून बसले होते. सोमवारी आरोपी पडघ्यामध्ये आल्यानंतर कार घेऊन निघाला. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग चालू केला. पडघा टोलनाका येथे पोलिसांनी आरोपीच्या कारला धडक दिली. आरोपीने गाडी थांबवल्यानंतर तात्काळ आरोपीला पकडण्यात आल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक परशुराम लोंढे यांनी दिली. फैय्याज शेख (३५) असे या आरोपीचे नाव असून आरोपीला वाशिंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात