ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावाने धमकाविणारा 'हा' आहे भामटा
ठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊद आणि छोटा शकील च्या नावाने धमकवणाऱ्या युवकाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ( गुन्हे शाखेने ) अटक केलीय. वसीम मुल्ला (वय-28) असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव असून तो मुंब्रा परिसरात राहणारा आहे. इंटरनेट वरून नगरसेवकांचं नाव आणि नंबर काढून हा युवक धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत त्याने पाच नगरसेवक आणि पोलिसांना धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. मुंब्रा परिसरात राहणारी महिला तरनुम कुरेशी यांचा मोबाईल त्यांच्या मोलकरणीने काही महिन्यांपूर्वी चोरला होता. अकबरअली डावरी असे मोलकरणीचे नाव असून या मोलकरणीनेच हा मोबाईल या युवकाला विकला होता.
आईशी भांडण करून घराबाहेर पडली तरुणी.. नराधमाने घेतला याच संधीचा फायदा
ज्या नंबरने महापौरांना धमकावण्यात आले होते ते नंबरचा शोध लागल्याने कुरेशी यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हा मोबाईल काही महिन्यांपूर्वी चोरीला गेला असल्याचे त्यांनी सांगितले . त्यानंतर मोलकरणीला ताब्यात घेतल्यानंतर मोबाईल या युवकाला विकला असल्याची कबुली दिल्यानंतर आरोपी पर्यंत पोलीस पोहचले.
अटक करण्यात आलेला आरोपी हा यापूर्वी सौदीत लेबर म्हणून काम करत होता. सध्या त्याला क्षयरोगामुळे नोकरी कोणीही देत नाही. हा युवक मानसिकदृष्ट्याही ठीक नसल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. मुंब्रा,अमृतनगरमधून मुल्ला याला अटक केली. त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीच संबंध नसल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. चोरीचा मोबाईल विकत घ्यायचे आणि इंटरनेटवरून विविध क्रमांक मिळवून कुणालाही त्रास द्यायचे प्रताप तो करीत असल्याचे उघड झालंय. या प्रकरणाची सायबर तज्ञकडून चौकशी सुरु असून शनिवारी मुल्ला याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अशी माहिती पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.