ताजी बातमी

सापुतारा : सेल्फी काढताना दुर्घटना झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या महिलेसोबत घडला आहे. खरंतर अनेकांचं सेल्फीचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आपण कुठेही गेलो की लागलीच सेल्फी काढायची आणि सोशल मीडियावर टाकायची. याचं वेड लागलेली एक नवीन सोशल जमात उदयाला आली आहे. पोस्टला मिळणाऱ्या लाईक्स, त्यावर होणारं कौतुक आणि यातून मिळणारा आनंद अशी सध्याची लोकं जगत असतात. खरंतर सेल्फीच्या प्रेमामुळे अनेक दुर्घटना घडतात. काहींना तर आपला प्राणही गमवावा लागला तर काहींच्या हा सेल्फी जीवावर बेतला. सापुताऱ्याला अश्याच एका दुर्घटनेत सेल्फीने महिलेचा जीव घेतला आहे. नाशिकची एक महिला थेट दरीत कोसळली आहे.

सेल्फी काढताना महिलेचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. सुषमा मिलिंद पगारे असं या महिलेचं नाव आहे. यामध्ये सुदैवाने सुषमा यांचा जीव वाचला आहे. पण त्या गंभीर जखमी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांना दरीतून बाहेर काढत उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.














सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात