ताजी बातमी

देशभरातील १२९ विमानतळ 'प्लास्टिकमुक्त' करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला होता. त्यापैकी ३५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोहिमेपासून दूरच होते

एएआयच्या ताब्यात जवळपास १३५ विमानतळ आहेत. या विमानतळांचा प्रदूषण अभ्यास जानेवारी महिन्यात करण्यात आला. त्याआधारे सध्या कार्यरत असलेल्या १२९ विमानतळांवर प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत केवळ एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पेले, पिशव्या आदींवर विमानतळ परिसरात बंदी घालण्यात आली. पहिल्या टप्प्यात १५ विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली.

प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय एएआयने त्यांच्या अखत्यारित असलेल्या विमानतळांबाबत घेतला आहे. पण मुंबई विमानतळाची मालकी जीव्हीके समूहाकडे आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. तसे असले, तरी एएआयने प्लास्टिकबंदी केलेल्या ३५ विमानतळांमध्ये राज्यातील पुणे, गोंदिया, औरंगाबाद येथील विमानतळांचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात