ताजी बातमी

मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे. सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा 39300 ( GST सह )आहे. कालच्यापेक्षा हा दर वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1 हजार 503 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर 17. 47 डॉलर प्रतिऔंस आहे.

2010 साली 18000 ते 19000 च्या दरम्यान असलेला सोन्याचा दर आता 2019 मध्ये 40 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर 31 हजार 912 होता. तो आता 39 हजार 300 झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमती, अमेरिका - चीन ट्रेड वॉर, भारतीय रुपयाचं गडगडलेलं मूल्य, जागतिक मंदीसदृश परिस्थिती अशी अनेक कारणं सोन्याच्या भाववाढीमागे आहेत.

दसरा किंवा विजया दशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी आवर्जून सुवर्ण खरेदी केली जाते.

त्यामुळे आजची दसऱ्याची भाववाढ ही स्थानिक बाजारातल्या वाढलेल्या मागणीमुळे झाली आहे. सोमवारी सोन्याच्या मागणीत घट झाल्याने दर कमी झाले होते.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी होते. त्यामुळे त्या वर्षातला दसऱ्याच्या दिवशीचा दर महत्त्वाचा ठरतो. 2010 साली दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर होता 19हजार 820 आणि आजचा दर आहे 39 हजार 300. 2015 नंतर असाच सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आदल्या वर्षी 26 हजार 862   असलेला दर 2016 च्या दसऱ्याला 29 हजार 678 वर पोहोचला. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर 31 हजार 912 होता. तो आता 39 हजार 300 झाला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात