ताजी बातमी

ठाण्यात खड्ड्यांमुळे अजून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. शिळ-डायघर परिसरात झालेल्या या अपघातात मुंब्रा येथील असिम सिद्दीकी नावाच्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. रस्त्यावरील खड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असिमचे पिता जावेद सिद्दीकी यांनी केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असिम हा मंगळवारी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शिळ परिसरात गेला होता. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरची धडक दुचाकीला बसल्याने असिम आणि त्याचा मित्र खाली पडून जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या असिमला तातडीने मुंब्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

असिमचे वडील जावेद सिद्दीकी यांनी रस्त्यावरील खड्यांमुळे मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तर, अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात