ताजी बातमी

पुणे: विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्यार्थिंनींसोबत अश्लीस चाळे करणाऱ्या खासगी क्लासेसच्या संचालकाला संतप्त पालकांनी चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिंहगड रोड परिसरात एका खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला पालकांनी चोप दिला. अभिरुची मॉल पोलिस स्टेशन समोर असलेल्या शिक्षा अकॅडमीमध्ये ही घटना घडली. पालकांनी आरोप केला की हा संचालक खासगी शिकवणीत समजावून सांगण्याच्या बहाण्याने मुलींना कथितरित्या मांडीवर बसवायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचा. त्यापैकीच काही मुलींनी आपल्या पालकांना तक्रार केली आणि पालकांनी थेट संचालकाच्या कार्यालयात धडकून त्याची धुलाई केली.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना पोलिस स्टेशनच्या अगदी समोर घडली. तरीही पोलिसांची याची खबर देखील नाही. पालकांनी पोलिसांवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील केला आहे. व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मारहाण करणारी महिला एक आई आहे. धुलाई सुरू असताना एका महिलेने आरोप लावत असल्याचा व्हिडिओ देखील असल्याचे सांगितले. यानंतर संचालकाने आपली चूक मान्य केली आणि माफी देखील मागितली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात