२५ लाखांचा गुटखा जप्त
राज्य सरकारने बंदी लादण्यात आली असली तरी छुप्या मार्गाने गुटख्याची तस्करी अद्याप सुरूच असून, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नागपाडा परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे २५ लाखांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला. या गुटख्याची किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली.
आधारे युनिट १चे प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक महेश तावडे, सहायक निरीक्षक शिंदे, ठाकूर यांच्या पथकाने नागपाडा येथील मस्तान तलाव आणि दोन टाकी येथे छापे टाकले. या दोन्ही ठिकाणी गोदामामध्ये गुटखा लपवून ठेवण्यात आला होता. हा सर्व अन्न आणि औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुटख्याची विक्री करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्याने इतका मोठ्या प्रमाणात गुटखा आणला कुठून याचा तपास पोलिस करीत आहेत.