समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणमध्ये ग्रीनफिल्ड महामार्ग
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून जाणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 500 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग (Express Way) कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.