ताजी बातमी

इसम नामे- भुल्लू मोतीलाल पटेल , वय-२8 वर्षे यांनी दि.26/03/2020 रोजी रात्री 19:30 वा. समक्ष पोलिस ठाणेस येऊन कळविले की, दोन दिवसात पासून घरी जेवन बनले नाही, ते चालक असून त्याचा मालक गावी गेला आहे. पैसे न मिळाल्याने घरी असणारे सात लोक ( 01 पुरुष +02 महिला + 04 मुले) उपाशी पाणी पिऊन झोपत आहे , त्याची पत्नी गरोदर आहे काही खाण्यास मिळावे याकरिता ते पोलिस मदत मागत होते. परिस्थिती पाहता त्याना तात्काळ जेवण व काही रोख रक्कम देत दि.27/03/2020 रोजी सकाळी भेटण्यास बोलावले. नमूद इसम व त्याचे कुटुंबातील सदस्य कोकरी आगार बिट क्र. 03 येथे आले असता, आम्ही मुलांना जेवणा बाबत विचारले असता त्यांनी आम्हाला ते शेजारच्यानी दिलेला भात त्यात पाणी टाकून पीत असल्याचे सांगत भुकेल्या नजरेने पाहत होते. आम्ही मदतीची सत्यता पडताळून लागलीच

त्यावर आम्ही पोलीस स्टाफ व काही रहिवाशी याची मदत घेत सदर इसमास एक महिना उपाशी राहणार नाही असा पुरेल एवढा किराणा माल, दूध, भाजीपाला, गहू, तांदूळ, तेल व काही रोख रक्कम देत मदत केली आहे.....सोबत करोनाबाबत काय खबरदारी व काळजी घ्यावी ही माहिती देखील दिली.

पो. उप नि. पाऊलबुद्धे, पो. ना. सुरवसे व पो. ना. होनमाणे 

अँटॉपहिल पोलिस ठाणे , मुंबई (एक सामाजिक जबाबदारी)

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात