ताजी बातमी

मुंबई दि  ३०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा  मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व् संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसांत १२ कोटी  ५० लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

 याशिवाय २० तारखेपासून आजतागायत  सीएसआर  निधीतून तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग व् संस्थानी मदत देणे सुरु केले आहे.

इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फ़ार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एम्एसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी मास्कस, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स , आरटी- पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर अशी सुमारे १० कोटी  रुपयांची विविध उपकरण व् साहित्य देऊ केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

 कोविड  19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात