राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित
राजभवन भेटीची योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे आज राजभवनाकडून जाहीर करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला दिनांक ३१ मार्चपर्यंत भेटी बंद करीत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीचा विचार करून संपूर्ण एप्रिल महिन्याकरिता सकाळी होणारी राजभवन सैर रद्द करण्यात आली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.